तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल चे आयाेजन
कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल यांच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता तरंदळे शाळा नंबर एक येथे लहान मुलांपासून ते महिला व पुरुष आणि खास करून वयोवृध्द आपल्या गावातील रहिवासी साठी माेफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.तरी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती तरंदळे ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आली आहे.जास्तीत जास्त जणांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा.चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा मानस तरंदळे ग्रामपंचायत आणि लायन्स आय हॉस्पिटल यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
तरंदळे ग्रामपंचायत आयोजित महिला दिना निमित्त बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी 9.45=महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घघाटन.
सकाळी 10. वाजता=मोफत नेत्र तपासणी.( तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल यांच्यावतीने)
सकाळी 10.30. वाजता= सन 2022 ते 23 जिल्हास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेत कबड्डी स्पर्धेत तरंदळे शाळा नंबर एक लहान गट यांनी उपविजेता ठरल्या बद्दल त्यांचा सत्कार.
दुपारी 2 वाजता महिलांसाठी व आपल्या गावातील विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.प्रथम च आपण विधवा महिलांना त्यांचा मान,सन्मान,देण्यासाठी विधवा महिलांना समाविष्ट करत आहोत.जास्तीत जास्त विधवा महिलांचा सहभाग असावा.
दुपारी 2.30 वाजता= आपल्या गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान.
दुपारी 3.30 वाजता= सरपंच यांचं मनोगत,आभार व समारोप.