संजू परब व विशाल परब यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती
कुडाळ (प्रतिनिधी) : भाजपचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे शिव छत्रपतींच्या जीवनावर प्रकाश झोत टाकणारे “शिवगर्जना” हे महानाट्य सादर केले जाणार आहे, अशी माहिती आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते संजू परब व विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी येथे दिली. दरम्यान या नाटकात तब्बल ७०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. हे नाटक शिवप्रेमींना मोफत पाहायला मिळणार आहे. १७ व १८ तारखेला कुडाळ येथे होणार आहे. याचा जास्तीत-जास्त शिवप्रेमींनी फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी दोघांकडून करण्यात आले.आज कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक सावंत, दादा साईल, विनायक राणे, राकेश कांदे आणि नाटकाचे दिग्दर्शक स्वप्निल यादव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. परब म्हणाले, भाजप व विशाल फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी वेगळा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दृष्टीने शिवप्रेमींना साथ घालण्यासाठी शिवगर्जना हे महानाट्य कुडाळ येथे सादर करण्यात येणार आहे. या तब्बल ७०० अधिक कलाकार असणार मोठा सेट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शिवकालीन रोमांचकारी दृश्ये लोकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान श्री. राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ व देशपातळीवर नेते उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या काळात नेमका कार्यक्रम कसा केला जाईल याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत-जास्त लोकांनी या नाटकाला उपस्थित राहावे, असे आवाहन दोघांकडून करण्यात आले.