तेरेखोल नदीपात्रालगत फलक लावत दिला सावधानतेचा इशा
बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या वाढली असून दिवसेंदिवस पाळीव जनावरे व शेतकऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांना याबाबत सावधानता बाळगण्यासाठी वनविभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नदीपात्रालगत वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा फलक लावण्यात आले आहेत. यावेळी बांदा वनपाल अनिल मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या सौ. श्रेया केसरकर, साई तेली, मंदार सावंत, शैलेश केसरकर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.