अवघी  दुमदुमली नगरी……!

मसूरे देऊळवाडा जि.प.प्राथमिक शाळेच्या विध्यार्थ्यांची वारकरी दिंडी

मसूरे (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीचे औचित्य साधून मसूरे देऊळवाडा जी. प. प्राथमिक शाळेच्या विध्यार्थ्यानी काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली. साक्षात विठ्ठल या दिंडीत विराजमान झाल्याचा भास होत होता. सर्व मुलांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा करत वातावरण निर्मिती केली होती.यावेळी अभंगगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक प्रशांत पारकर, गुरुनाथ ताम्हणकर, सौ तेजल ताम्हणकर व  सहकारी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. 

error: Content is protected !!