आचरा (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या वह्यानचे आज चिंदर गावातील जि.प. शाळा चिंदर नं 1, शाळा चिंदर बाजार, जि. प. शाळा अपराजवाडी, पडेकाप शाळा, जि.प. शाळा कुंभारवाडी, भटवाडी शाळा, चिंदर सडेवाडी शाळा, पालकरवाडी शाळा येथे सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.
यावेळी भाजप शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, भाजप नेते प्रकाश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, बूथ अध्यक्ष अरविंद घाडी, दिगंबर जाधव, संतोष अपराज, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, शिक्षक- गंगाराम पोटघन, पंढरीनाथ करवडकर, नंदकुमार जुधंळे, स्मिता जोशी, नवनाथ भोळे, भीमाशंकर शेतसंदी, राजेंद्र चौधरी, रतन बुटे, निशिगंधा वझे, शुभांगी लोकरे-खोत, अन्नपूर्णा गायकवाड, उज्वला पवार, अमोल खेडेकर, अंगणवाडी सेविका- नीलिमा घाडी, दुर्वा चिंदरकर, गीता पाटणकर, लक्ष्मी चिंदरकर, सोमनाथ अपराज, मनस्वी नार्वेकर, सुप्रिया बांदिवडेकर सुवर्णा अपराज, शीतल अपराज, वासंती कानविंदे, गीता केरकर आदी उपस्थित होते.