कणकवली (प्रतिनिधी) : कै. मायादेवी रावराणे चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब कणकवली च्या वतीने कै. मायादेवी रावराणे यांच्या स्मृतिदिनीनानिमित्त गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा मंगळवार 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कै. मायादेवी ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक सामाजिक विधायक उपक्रम दरवर्षी राबविले जातात. समाजातील गरजूना त्याचा फायदा होत असतो. सांगुळवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रोटरीयन डॉ विद्याधर तायशेटे असणार असून उद्योजक विकास काटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर रावराणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कै. मायादेवी रावराणे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ राजेंद्र रावराणे, कणकवली रोटरी क्लब प्रेसिडेंट प्रा जगदीश राणे, सांगुळवाडी प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्नेहलता राणे यांनी केले आहे.












