कवठी मुंबई मंडळाच्या अध्यक्षपदी सिंधू पुत्र संजय उर्फ बाबल्या करलकर

मसुरे (प्रतिनिधी) : कवठी मुंबई मंडळाच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवठी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध छायाचित्रकार संजय उर्फ बाबल्या करलकर याची नुकतीच एकमताने मुंबई येथे निवड करण्यात आली. संजय करलकर यांचे सिंधूदुर्ग जिल्हा सहित मुंबई येथे सामाजिक, कला, क्रीडा, आरोग्य आधी क्षेत्रांमध्ये भरीव असे योगदान आहे. मुंबई येथे विविध महोत्सव भरविण्यामध्ये त्यांचा मोठा हात असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार, भजन आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अनेक गरजवंतांना त्यांनी वेळोवेळी आधार दिला आहे छाया चित्रणाच्या माध्यमातून त्यांनी आपली कला जोपासत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावलौकिक मिळविला आहे. सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. कवठी गावच्या विकासात्मक प्रश्नांबाबतही त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे.

यावेळी इतर कार्यकारणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष अरुण मेस्त्री, उपकार्याध्यक्ष संजय चिंचकर, मनोज खडपकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर खडपकर, दिनकर परुळेकर, नामदेव बांदेकर, दीपक कवठकर, सचिव नामदेव कवठकर, सहसचिव सहदेव परुळेकर, खजिनदार निलेश मांजरेकर, सहखजिनदार दिनार परुळेकर, हिशोब तपासणीस उमेश गोवेकर, संजय वाडेकर, रामदास परुळेकर, संदीप वाडेकर, सल्लागार उल्हास कवठकर, सुधाकर करलकर, अरुण खडपकर, गुंडू योगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!