चिंदर मध्ये पावसाने पडझड होऊन सुमारे दिड लाखाच्यावर नुकसान !

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस सुरु असलेल्या ढग फुटी सदृश पाऊस व वादळी वाऱ्याने ठिक ठिकाणी मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. चिंदर गावातही सुमारे, 1 लाख 60 हजाराचे नुकसान झाले असल्याचे प्रशासनाला प्रथम दर्शन दिसून आले आहे. चिंदर साटमवाडी येथील राजु साटम यांचे सुमारे 25000 हजार, लब्देवाडी येथील रघुनाथ लब्दे यांचे सुमारे 21000 हजार, भटवाडी येथील दिलीप पेडणेकर यांचे सुमारे 70000 हजार, गावठणवाडी येथील भालचंद्र गोलतकर यांचे सुमारे 25000 हजार, चिंदर सडेवाडी येथील संदेश फाटक यांचे सुमारे 1900 हजार असे प्रथम दर्शनी नुकसान दिसून आले.

सदर पहाणी वेळी तलाठी रविराज शेजवळ, तलाठी संतोष जाधव, पोलीस पाटील दिनेश पाताडे, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, कर्मचारी रणजित दत्तदास आदी उपस्थित होते. पुढील कारवाई मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शना खाली भटवाडी सजा तलाठी रविराज शेजवळ आणि चिंदर बाजार तलाठी संतोष जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!