फोंडाघाट (प्रतिनिधी) : “परमपूज्य सदगुरु भोसले महाराज” यांनी अनुग्रह दिलेल्या फोंडा पंचक्रोशीतील त्यांच्या सर्व शिष्यगण यांनी आज नवीन कुर्ली याठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी केली.
आपल्या जीवनात ज्या सद्गुरूंनी मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवला आणि जीवन कसे जगावे हे शिकवले असे सदगुरु भोसले महाराज तसेच त्यांच्या वारसा पुढे चालू ठेवणारे विजय मेस्त्री महाराज यांचे पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.त्याप्रसंगी शिष्यगण मा. जि. प. सदस्य संजय आग्रे, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे, कुर्ली सरपंच विजया पवार, संतोष टक्के, राजेंद्र कोलते, अमित दळवी, कृष्णा परब, सुरज तावडे, सखाराम हुंबे,भाई डंबे, सदानंद राणे, अतुल डऊर, अंकुश पिळणकर, प्रकाश दळवी, मधुकर शिंदे, सचिन परब तसेच मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.











