शालेय विद्यार्थी व वाहन चालक यांना सहन करावा लागत आहे त्रास
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गवरून थेट खारेपाटण बाजारपेठ व एस टी बस स्थानक कडे येणाऱ्या गावातील मुख्य रस्त्याची सद्या मोठ – मोठे खड्डे पाडून दुरवस्था झाली असून यामुळे शालेय विद्यार्थी व सर्वच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण गावात येणाऱ्या या मुख्य रस्त्याची पहिल्या पावसात दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या कडेलाच लागून खारेपाटण हायस्कूल असून या शाळेतील विद्यार्थी या रस्त्यावरून साईडने चालत जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाचा चिखल शालेय विद्यार्थ्यांचा अंगावर उडत असून शालेय विद्यार्थ्यांचे कपडे खराब होत आहेत.याचे कारण म्हणजे या रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे या खड्यातून पाणी साचल्यामुळे वाहन चालकाना देखील खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनाचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या रस्त्याला साईड गटार नसल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरूनच वाहताना दिसत आहे. याचा शालेय विद्यार्थी व वाहनचालक याना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बाधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने डागडुजी करून दुरस्ती करावी अशी मागणी नागिकांमधून केली जात आहे.












