योगेश पडवळ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अविस्मरणीय भेट..!

योगेश पडवळ चिंदर गावचे सुपुत्र तथा चारकोप विधानसभा (मुंबई) महामंत्री

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे सुपुत्र तसेच मुंबई येथील चारकोप विधानसभा भारतीय जनता पार्टी महामंत्री योगेश दामोदर पडवळ यांची मुंबई दौऱ्यावर असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सांताक्रुज येथे अविस्मरणीय भेट घडून आली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बहुसंख्य – आय, पी, एस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी बद्दल भावना व्यक्त करताना योगेश पडवळ म्हणाले की पंतप्रधान मोदी यांना प्रत्यक्ष भेटल्यावर जगातील एका महान व्यक्तीला भेटल्याचा, साधू संतांना भेटल्याचा सारखा अनुभव आला तसेच आपण आयुष्यात भारतीय जनता पार्टी म्हणून केलेले प्रामाणिक काम तसेच आई, वडिलांचा आशीर्वाद सहकारी मित्र यांचे सहकार्य यामुळे पंतप्रधान मोदींची होऊ शकली.

error: Content is protected !!