वेंगुर्ले (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याची महत्त्वपूर्ण भुमिका ही कृषीसहाय्यकाची असते. परंतु वेंगुर्ले तालुक्यात गेली कित्येक बर्षे ही पदे रिक्त असल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो , त्यामुळेच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही. वेंगुर्ले तालुक्यामध्ये एकुण १२ कृषीसहाय्यक पदे मंजूर आहेत . परंतु गेली कित्येक वर्षापासुन ५ ते ६ कृषीसहाय्यकांच्या जिवावर संपुर्ण वेंगुर्ले तालुक्याचा कारभार हाकला जातो . उभादांडा , वेतोरे , मातोंड , तुळस अशा मोठ्या प्रमाणात शेतकरी असलेल्या गावामध्ये कृषीसहाय्यक पद हे गेली पाच ते सहा वर्ष रिक्त आहे. त्यामुळे शासनाच्या लोककल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत . ही अडचण लक्षात घेऊन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांनी तात्काळ अंकुश माने , सहसंचालक कृषी विभाग , ठाणे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क करुन तातडीने वेंगुर्ले तालुक्यातील रिक्त असलेली कृषी सहाय्यक पदे भरावी , अशा सुचना दिल्या . त्यामुळे लवकरच वेंगुर्ले तालुक्यातील कृषीसहाय्यक पदे भरली जाणार आहेत .