बांदिवडेत भाजप कडून वह्या वाटप कार्यक्रम !

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदिवडे शाळा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी खासदार निलेश राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शाळेतील तसेच अंगणवाडीतील सर्व मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बांदिवडे सोसायटी अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, माजी उपसरपंच सतीश बांदिवडेकर, आनंद परब, शंकर आईर, उमेश परब, उदय सावंत, दिनेश परब, लीलाधर मुणगेकर, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!