अंशतः अनुदानित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन

टप्पा वाढ अनुदानचा शासन निर्णय काढावा तसेच अनुदानासाठी प्रचलित धोरण काढावे अशी मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांनी बुधवार दिनांक २४/०७/२०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन अंशतः अनुदानित शाळा /कॉलेज /वर्ग /तुकड्या यांना ३० जुलै, २०२४ च्याआत टप्पा वाढ अनुदानचा शासन निर्णय काढावा तसेच अनुदानासाठी प्रचलित धोरण काढावे असे निवेदन शासनाकडे सादर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व अधिक्षक माध्यमिक शिक्षण विभाग यांचेकडे सादर केले. यावेळी अंशतः अनुदानित संघटना अध्यक्ष आर बी चौगले, उपाध्यक्ष राहुल कदम, सचिव सागर करडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!