१७ जुलैला नापत्ता झालेले असलदे येथील धाकु मयेकर यांच्या शोधासाठी तहसिलदार दीक्षांत देशपांडे ” ऑन फिल्ड”

पियाळी नदी पात्रात शेवरे ते गडीताम्हाणे मुख्य स्पॉटवर शोधमोहीम

एनडीआरएफचे ३० जवान , महसुल पथक व ५० ग्रामस्थांच्या मदतीने राबवली शोधमोहीम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे दिवानसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर ( वय ७८ वर्षे ) हे १७ जुलै रोजी शेतीच्या कामासाठी शेतात गेले असताना वाहून गेले त्यांची छत्री पियाळी नदीकाठी आढळून आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पुन्हा शोध मोहीम राबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्यानुसार कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली एनडीआरएफचे ३० जवान , महसुल पथक व ५० ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात असलदे ते गडीताम्हाणे मुख्य स्पॉटवर शोधमोहीम सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राबण्यात आली. नापत्ता धाकु मयेकर शोधासाठी स्वत: तहसिलदार दीक्षांत देशपांडे ” ऑन फिल्ड” राहून शोधमोहीम राबवल्याने असलदे ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान नदीला पूरस्थिती असल्याने शोधमोहीमेला अपयश आले.

तहसिलदारांनी नागरिकांशी साधला संवाद –

नापत्ता शेतकरी धाकू मयेकर यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाला सोबत घेवून महसुल विभागाने गुरुवारी असलदे गावातील ग्रामस्थांच्या मदतीने विशेष मोहीम राबवली . सुरुवातील तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शोध मोहीमेचा रोडमॅप निश्चित केला. त्यानुसार पियाळी नदी पात्रातील देवगड तालुक्यातील शिरगांव – शेवरे येथे जावून नागरिकांशी संवाद साधला . ज्याठिकाणी ग्रामस्थांना संशयित मृतदेह दिसल्याचे वृत्त मिळाले होते. त्यानुसार तेथील लोकांशी चर्चा करुन शोध मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर संपुर्ण टीम घेवून संभाव्य मृतदेह मिळण्याची शक्यता असलेले देवगड – वळीवंडे खराटा नदीपात्र ज्याठिकाणी पाण्याचा प्रवाह संथ होतो. तिथे शोध घेण्यात आला त्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या सुचनेनुसार देवगड – गडीताम्हाणे तेली वाडी येथील नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली . याठिकाणी मदतीसाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम , वळिवंडे सरपंच नागेश वळंजु , शिरगांव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम , माजी सरपंच प्रकाश सावंत , महेश मोंडकर , कोतवाल राजेंद्र ताम्हणकर , पत्रकार दिनेश साटम आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

चिखलमय भागातही तहसिलदारांनी घेतला शोध …

नापत्ता धाकू मयेकर यांच्या संपुर्ण शोध मोहीमेत ..

तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी काटेरी झुडपे, नदीपात्रातील काटेरी झाडी , छोट्या पायवाटा ,चिखलमय भाग परिसरात शोध घेतला. सकाळी शोधमोहीम सुरु झाल्यापासून ते थांबेपर्यंत न थकता तहसिलदारांनी घेतलेली मेहनत वाखान्यजोगी होती. स्वत : पुढाकार घेवून शोधासाठी सर्व अधिकारी , कर्मचा-यांना प्रोत्साहन आणि कर्मचा-यांनची काळजी ही घेत होते ‌‌ या मोहीमेत तहसिलदार सातत्याने एनडीआरएफ च्या पथकाशी चर्चा आणि मोहीमेची व्यूह रचना कणखरपणे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी राबवल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

अतिवृष्टीमुळे शोधमोहीमेत अनेक अडचणी

असलदे येथील नापत्ता धाकू मयेकर यांच्या शोधासाठी कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम राबवण्यात आली. ही शोधमोहीम राबवताना वळीवंडे येथे झाड कोसळून मार्ग बंद झाला होता . तो एनडीआरएफच्या पथकाने तो खुला केला. त्यानंतर पुढील शोधमोहीम राबवण्यासाठी वळीवंडे ते गडीताम्हाणे जात असलेल्या मुख्य मार्गवर भलेमोठे रतांबीचे झाड कोसळून रस्ता बंद झाला होता. पुन्हा एकदा तहसिलदारांच्या आदेशानुसार एनडीआरएफतच्या पथकाने लाकूड कापण्याच्या मशीनद्वारे झाड तोडून जवानांनी वाहतूकीस रस्ता खुला केला. ही शोधमोहीम राबवताना मुसळधार पाऊस व झाडांची पडझड अशा अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या.

या मोहीमेत कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे , पोलीस उपनिरिक्षक महेश शेडगे , पोलीस श्री. पार्सेकर , मंडल अधिकारी दिलीप पाटील , नांदगांव मंडल अधिकारी ए.आर. जाधव , शिरगांव मंडल अधिकारी राहूल निग्रे , कोळोशी तलाठी प्रविण लुडबे , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब , ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर , कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले , असलदे पोलीस पाटील सावित्री पाताडे, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , उदय परब,जयप्रकाश पाताडे, बाबाजी शिंदे, बाबू जांभळे, सुरेश मेस्त्री ,बापू परब,दिनेश शिंदे,गोविंद शिंदे,अनंत परब , बाळा परब, श्रीकृष्ण परब , सुभाष परब , रोहीत परब, गोपी परब , कृष्णा परब , ग्रामसेवक संजय तांबे, ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब, सत्यवान घाडी , अनिल परब, कोतवाल मिलींद तांबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!