बिळवस जलमंदिर कडे जत्रा कालावधीत एकेरी वाहतूक मार्ग !

जत्रा नियोजनाचा पोलीस निरीक्षक यांनी घेतला आढावा !

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मसूरे गावची मुळ माया अशी ओळख असलेल्या बिळवस श्री सातेरी देवी जल मंदिर आषाढ महिन्यातील देवीचा वार्षिक जत्रोत्सव 27 जुलै रोजी संपन्न होत आहे. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी जलमंदिर येथे भेट देत जत्रा पूर्व नियोजनाचा आढावा घेतला. मंदिर जवळ पोहोचणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्व वाहनाना एकदिशा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. जलमंदिर जवळ येणारी भाविकांची सर्व वाहने बिळवस मुख्य रस्त्यावरील धाकूधाम येथून प्रवेश करणार आहेत. मंदिराकडून सर्व वाहने एकदिशा मार्गाने बिळवस ग्रामपंचायत लागतच्या रस्त्याने मुख्य रस्त्यावर बाहेर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जादा पोलीस बंदोबस्त असणार आहे. देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या नियोजनप्रमाणे जत्रोत्सव यशस्वी करूया असे प्रवीण कोल्हे म्हणाले. ट्रस्ट अध्यक्ष भाई सावंत यांनी स्वागत केले. यावेळी सरपंच मानसी पालव, ग्रामसेवक युगल प्रभूगावकर, ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष सूर्यकांत पालव, ट्रस्ट पदाधिकारी, विश्वस्थ, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार संतोष पालव यांनी मानले.

error: Content is protected !!