अतुलनीय..म्हणे संसारोपयोगी वस्तू आणि भांड्याकुंड्यांशिवाय घरात राहा

अरविंद रावराणेंची अतुल रावराणेना सणसणीत चपराक

वैभववाडी (प्रतिनिधी) : अलीकडेच स्वयंघोषित शिवसेना नेते म्हणवणाऱ्या अतुल रावराणे यांनी बिन फर्निचर च्या वैभववाडी पं स च्या इमारतीचे मोठ्या आवेशात उदघाटन केल्याचा दिखावा केला. पण जर नवीन बांधलेल्या घरात भांडीकुंडी नसतील,  संसारोपयोगी साहित्य नसेल तर गृहप्रवेश करून उपयोग काय ? असा खोचक सवाल करत माजी सभापती अरविंद रावराणे यांनी अतुल रावराणे यानी प्रसिद्धीपत्रकातून सणसणीत चपराक दिली आहे. अरविंद रावराणे यांनी म्हटले आहे की नूतन इमारती चे बांधकाम होऊन त्यावर लोखंडी छप्पर सुद्धा घालण्यात आले.मात्र पं स.च्या इमारतीत आवश्यक असणारे फर्निचर अद्याप बसविण्यात आलेले नाही. पं स च्या नवीन इमारतीमधील फर्निचर साठी शासकीय कार्यवाही सुरू आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांना बैठक व्यवस्थे साठी टेबल खुर्च्या, अभ्यागतांची बैठक व्यवस्था, तसेच शासकीय दस्तऐवज ठेवण्यासाठी फर्निचर महत्वाचे असते. आपण जेव्हा नवीन घर बांधतो तेव्हा घरात राहण्याआधी आवश्यक संसारोपयोगी साहित्य, तसेच भांडीकुंडी आदी वस्तूंची तजवीज करतो. नंतरच गृहप्रर्वेश करतो.परंतु केवळ अंगाने वाढलेल्या आणि मेंदू ने बालबुद्धी असलेल्या अतुल रावराणे याना याचे भान राहिले नाही आणि त्यांनी आवेशाच्या भरात जबरदस्ती ने पं स च्या नूतन इमारतीच्या चाव्या कर्मचाऱ्यांकडून घेऊन फीत कापून उदघाटन केल्याचा दिखावा केला. माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे अशी तकलादू आणि अर्धी अधुरी कामे कधीच करत नाहीत.जे करायचे ते भव्यदिव्य आणि सिंधुदुर्गवासीय जनतेच्या भल्याचे हेच राणे कुटुंबाचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे राणेंवर राळ ओकून स्वतःला नेता म्हणवणाऱ्या बालबुद्धी च्या अतुल रावराणे यांनी विना फर्निचर च्या इमारतीत जाऊन कर्मचाऱ्यांनी  काय करायचे याचेही उत्तर द्यावे असा टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!