युवासेना चषक भजन स्पर्धेत पावणाई प्रासादिक भजन मंडळ, कुणकेश्वर संघ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

खासदार विनायक राऊत यांनी केले युवासेना चषक भजन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे उद्घाटन

युवासेना कणकवली विधानसभेत राबविणार ” सेल्फी विथ मशाल ” हा नविन्यउपक्रम – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवगड तालुका शिवसेना – युवासेना आयोजित भव्य भजन स्पर्धा, युवासेना चषक भजन स्पर्धा -2024 ला भजन प्रेमींचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये देवगड तालुक्यातील 17 स्पर्धकांना सहभाग दिला होता. या युवासेना चषक भजन स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. राऊत साहेबांनी युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आयोजित केलेल्या युवासेना चषक भजन स्पर्धा २०२४ या नामस्मरनीय एक वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, आपचे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर, शिवसेना तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, फरीद काझी, शिवसेना महिला तालुका प्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर, नगरसेवक बुवा तारी, विशाल मांजरेकर, माजी तालुका प्रमुख प्रसाद करंदीकर, संजय देवरुखकर, रवींद्र जोगळ, प्रदीप नारकर, पूर्वा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुशांत नाईक म्हणाले, आताची युवा पिढी ड्रग्ज सारख्या व्यसनाच्या आहारी जात आहे, या युवा पिढीला योग्य दिशा देण्याची गरज आहे, भजन कला ही कोकणची संस्कृती आहे आणि ती जोपसण्यासाठी आपण प्रयन्त केले पाहिजेत. म्हणूनच युवासेनेच्या माध्यमातून या युवासेना चषक भजन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. याला मिळालेला प्रतिसाद पाहता आमचा हेतू सफल झाला असे नाईक यावेळी बोलले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशनुसार भगवा सप्ताह राबविण्यात येत असून या अंतर्गत कणकवली विधानसभा मतदार संघात सेल्फी विथ मशाल हार्दिक नावीन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. यावेळी रक्तदान शिरीराचे देखील आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबिरात एकूण 76 रक्तदात्यांनी रक्त दान केले.

युवासेना चषक भजन स्पर्धा – 2024 स्पर्धेला सकाळी 10 वाजता सुरवात झाली असून 17 स्पर्धेकांनी आपली कला यावेळी सादर केली. रात्री या स्पर्धेचा अंतिम टप्पा म्हणजे बक्षीस वितरण समारंभ पार पडले युवासेना चषक भजन स्पर्धेत पावणाई प्रासादिक भजन मंडळ, कुणकेश्वर बुवा रविकांत घाडी यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला यांना रोख रक्कम १५,१११ व सन्मानचिन्ह देउन गौरवविण्यात आले. द्वितीय क्रमांक पडेलकर प्रासादिक भजन मंडळ ढालवली बुवा अखिलेश फाळके यांनी पटकाविला यांना रोख रक्कम १०, १११ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर तृतीय क्रमांक सिद्धिविनायक प्रासादिक भजनमंडळ, बापार्डे बुवा संदेश नाईकधुरे या संघाने पटकाविला यांना रोख रक्कम ५, १११ व सन्मानचिन्ह देऊन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

उत्तेजनार्थ क्रमांक श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ मुणगे, बुवा बैभव शेट्ये, या संघाला २,१११ रुपये देऊन गौरविण्यात आले उत्तेजनार्थ द्वितीय माऊली प्रासादिक भजन मंडळ, नाडण बुवा कीर्ती पुजारे, या संघाला २,१११ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, उत्कृष्ट हार्मोनियम वादक गवळदेव प्रासादिक भजन मंडळ, पडेल बुवा श्रीधर हेमले, उत्कृष्ट तबला वादक सदानंद प्रासादिक भजन मंडळ, दाभोळे, उत्कृष्ट झाजवादक पडेलकर प्रासादिक भजन मंडळ,धालावली, उत्कृष्ट पखवाजवादक धीरज घाडी, उत्कृष्ट कोरस सदानंद प्रासादिक भजन मंडळ दाभोळे, उत्कृष्ट गायक श्री स्वामी समर्थ कावलेवाडी, बुवा शुभम कावले, यांना देखील गौरवविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून बुवा रपेंद्र परब व हेमंत तवटे यांनी काम पहिले होते.

यावेळी देवगड तालुक्यातील उपतालुकाप्रमुख प्रमोद वळंजू, सरपंच सुनील जाधव, विभागप्रमुख मंगेश फाटक,रामा राणे, संदीप डोलकर,विनायक साटम, युवासेना तालुका समन्वयक मनोज भावे, तालुका समन्व्यक सुनील तेली, महेंद्र भुजबळ,विभागप्रमुख विकास कोयंडे, शाखाप्रमुख प्रफुल कनेरकर, गुरु धुवाळी, दत्तप्रसाद धुरी, सुनील तिर्लोटकर आदी शिवसेना – युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!