कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ 23 जुलै 1955रोजी लोकमान्य टिळक जयंती दिनी भोपाळ येथे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी यांनी सात कामगारांसमवेत स्थापन केला होता. आज भारतीय मजदूर संघाने 70व्या वर्षांत पदार्पण केले आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग भारतीय मजदूर संघाने सभासद असलेल्या गावागावात आपआपल्या घरी संघटनेचा झेंडा ऊभारला आणि दुपारी अडीच वाजता जिल्ह्याचा कणकवली नगर वाचनालय सभागृहात कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग प्रभाकर सावंत आणि सहायक कामगार आयुक्त आयरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम घोषणा सामुहिक गीत झाल्यावर प्रमुख अतिथी आणि कामगार कार्यालय हुंबे साहेब व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .नंतर व्यासपीठावरिल मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून विश्वकर्मा, भारतमाता व संस्थापक ठेंगडीजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. प्रभाकर सावंत यांनी भारतीय मजदूर संघाची 69 वर्षाची कोणतीही फूट न होता अखंड कामगार सेवा चालू ठेवणारी राष्ट्रीय विचाराची अडीज कोटी सभासद संख्येसह निस्पृह कार्यकर्त्यांनी कामगार हितासाठी लढणारी देशव्यापी आणि ऊद्योगव्यापी संघटना आहे. माननीय दत्तोपंतासारखी ऋषी तुल्य अर्थ तज्ञ, प्रखर कामगार नेता, सामाजिक समरसता मंच स्वदेशी मंच संस्थापक नेता मिळाले होते म्हणून अशी साचेबद्ध कामगारहीत दक्ष संघटना मजबूतीने अग्रेसर आहे.भाजपाच्या वतीने संघटने समोरील समस्या परस्पर सहाय्याने सोडवूया असे सांगितले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. दूसरे अतिथी आयरे साहेब यांनी ही संघटना अनेक वर्षे चालावी व कामगार प्रश्न समाधान करत रहावी कारण शीस्त व संयम हा या संघटनेचे विशेष आहे.कामगार प्रश्न आपण तांत्रिक बाबी सांभाळून सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करतो, तसेच संघटनेस शुभेच्छा दिल्या.प्रस्तावना सचिव सत्यविजय यांनी केली. तावडे बाईनी गीत सांगितले.प्रभाकरजी आणि आयरे साहेबांचा शाल पांघरून सुधीर ठाकूर व जिल्हा ध्यक्ष विकास गुरव यांनी केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरेकर, घाडी अशोक,घाडी दाजी, हेमंत परब, ओंकार गुरव अखिल,बाळा साटम यांनी परीश्रम घेतले.ताटे, मडवळ, शुभांगी सावंत बागवे व साटम व सुमारे 679 कामगार बंधुभगीनी उपस्थित राहील्याने सभागृह खचाखच भरले होते. सुधीर ठाकूर यांनी सावंतजी व आयरे साहेबांनी कामगार प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषण विकास गुरव यांनी केले आभार जाधव यांनी मानले आणि एक भव्य कार्यक्रम साजरा केला.