तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, पदवीधर युवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) :
कोकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार ॲड.निरंजन डावखरे उद्या शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रथमच वैभववाडी येथे येत आहेत. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात वैभववाडीचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्या हस्ते ॲड.निरंजन डावखरे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तरी वैभववाडी तालुक्यातील सर्व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, तालुक्यातील पदवीधर युवक सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.