पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये इन्व्हेस्टिमर सेरेमनी उत्साहात संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : पोदार स्कुल मध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली शिस्तपध्दती आहे. कोकणातील या चार पाच जिल्ह्यांमध्ये कर्तुत्वान नेतृत्वगुण असलेली माणसे होवून गेली. कोकणाने महाराष्ट्र आणि देशाला दिशा देण्याचे काम केले. या कोकणातील टिळक, सावरकर, बॅ. नाथ पै., मधु दंडवते या उतुंग व्यक्तिमत्त्वांनी देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे. या शाळेतील अतिशय शिस्तपध्दतीने ‘इन्वेस्टीचर सेरेमनी ‘चाललेला कार्यक्रम पाहून मी भारावून गेलो आहे. विद्यार्थ्यांना जीवनात पुढे चालत असताना शिस्त फार महत्त्वाची असते. इंग्रजांनी केवळ बौध्दिक सामर्थ्य असल्याने त्यांनी अनेक वर्ष आपल्या देशावर राज्य केले. देशासाठी आणि राष्ट्रासाठी विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शरीरासाठी व आईसाठी वेळ दिला पाहिजे. आपण राष्ट्रहीतासाठी काम करण्याचे ठरवले होते. विद्यार्थ्यांनी जीवनात स्वत: कष्ट केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी राष्ट्रहितासाठी आतापासूनच चांगले नेतृत्वगुण आत्मसात करावेत असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले.
पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे ‘इन्वेस्टीचर सेरेमनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, शाळेच्या प्राचार्या राणी मारिया झेवियर, शाळेचे अँडमिन ऑफिसर अक्षय पेंढारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवडून आलेल्या समिती सदस्य विद्यार्थ्यांना बॅजेस प्रदान करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेतृत्व व कौशल्यपूरक प्रेरणादायी गीताचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासू वृत्ती बरोबरच जिज्ञासू वृत्ती व खिलाडू वृत्तीचा विकास करणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच महत्त्वाचे असते ते म्हणजे नेतृत्व गुण देखील विकसित करून त्यांचा योग्य तो वापर करून आपणासोबतच सर्वांनाच पुढे नेणे होय आणि याच नेतृत्वगुणाची निर्मिती व विकास करण्यासाठी कणकवलीतील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे ‘इन्वेस्टीचर सेरेमनी’ आयोजन करण्यात आले आहे.
शाळेच्या प्राचार्या राणी मारिया झेवियर म्हणाल्या, विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणासाठी शपथ घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांनी घेतलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या पाहिजेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील आर्या पडते व आठवीतून राज्ञी हर्णे या विद्यार्थिनीनी केले.