“भगवा सप्ताह” खाली कणकवली विधानसभे ची प्रथम बैठक कळसुली जि. परिषद येथून सुरु – जिल्हाप्रमुख संदेश पारकर

भगवा सप्ताह अंतर्गत गाव तेथे प्रचार कमेटी नेमणार – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमणे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने कणकवली विधानसभे मध्ये कळसुली जिल्हा परिषद येथे भगवा सप्ताह ची प्रथम बैठक पार पडली.कणकवली विधानसभा मतदार संघातून कळसुली येथून भगवा सप्ताह ची सुरवात करण्यात आली. कळसुली जिल्हा परिषद च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आळी. यामध्ये असे ठरवण्यात आले की प्रत्येक गावात प्रचार कमेटी नेमून, ज्या ठिकाणी रिक्त पदे असतील त्या ठिकानी पदाधिकारी नेमण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. येत्या कणकवली विधानसभे वरती भगवा फडकवन्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे आपण कणकवली मतदार संघात भगवा साप्ताहची सुरवात कळसुली जिल्हा परिषद येथून करत आहोत, जिल्हाप्रमुख म्हणून मी कणकवली विधानसभा मतदार संघात मालवण मध्ये भगवा सप्ताह सुरु करण्यासाठी जे काही प्रयन्त करावे लागतील ते आपण करूया व येत्या कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आपण सर्व जण सज्ज होऊया. पदाधिकाऱ्यांच्या बैठका गाव वार पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाचे महत्वाचे नेते असतील तालुका प्रमुख असतील यांची असेल. शिवसेना सभासद नोंदनी 50 हजार चा संकल्प देखील आपण करत आहोत, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पर्यंत केले पाहिजेत. झालेल्या प्रराभवाचे शल्य न घेता येत्या विधानसभे वर भगवा फडकवूया.

यावेळी अतुल रावराणे यांनी देखील मार्गदर्शन केले, मागच्या विधानसभेच्या वेळी कमी कालावधीत कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत ही वाखण्य जोगी होती. ते मतदान उद्धव साहेबांवर विश्वास ठेऊन व तुम्ही घेतलेल्या मेहनतिमुळे मिळाली होती, त्याचउलट समोरच्यांना जे मतदान मिळाले आहे ते 100 कोटी च्या धनशक्ती वर मिळालेली मते होती, त्यामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकवण्यासाठी आपण झटून काम करून उद्धव साहेबांचे हात बळकट करूया.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले की, काही जिल्हा परिषद ह्या वाटून दिल्यामुळे त्यात कळसुली जिल्हा परिषद ची जबाबदारी माझ्या वर असल्यामुळे ही बैठक प्रथम आपण घेत आहोत, गावा-गावात मशाल चिन्ह पोहचून, प्रत्येक गावात आपला पदाधिकारी सक्षम होईल या दृष्टीने काम करणे गरचेजे आहे. येत्या विधासभेसाठी गाव वार प्रचार कमेट्या नेमून एक प्रचार यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी, आमच्या वर देण्यात आली आहे,या अनुषंगाने भगवा सप्ताहच्या खाली आपण प्रत्येक गावात प्रचार कमेटी टयार करून या विधानसभे वर भगवा फडकवण्यासाठी आपण जि मेहनत आता पर्यंत घेत आलो आहोत, त्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन फक्त विधानसभेसाठीच नाही तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मध्ये देखील भगवा फडकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, विभागप्रमुख चंदू परब, युवासेना उपजिल्हाप्रमुख ललित घाडीगावकर, रुपेश आमडोस्कर, रवि सावंत, उपतालुका प्रमुख राजू राणे, युवासेना विभागप्रमुख रोहित राणे, ग्रामपंचायत सदस्य नंदू परब, उपविभाग प्रमुख महादेव राठोड, बाबू कुलकर्णी, रमाकांत राणे,नितीन धुरी आदी कळसुली जिल्हा परिषद येथील पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान संबधित अधिकार्याने नुकसान झालेल्या वीज ग्राहकांनी महसूल विभागामार्फत तलाठी यांच्याकडून पंचनामे करून घ्यावेत, असे सांगितले. मात्र महावितरणच्या दोषपूर्ण कारभारामुळे वीज ग्राहकांचे नुकसान झाले असेल तर महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचा संबंध काय असा प्रश्न वीज ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच शनिवार, रविवार हे दोन दिवस शासकीय कर्मचार्यांचे सुटीचे दिवस असल्याने जळलेल्या उपकरणांच्या पंचनाम्यासाठी किती दिवस ती उपकरणे दुरुस्तीविना जाग्यावर ठेवायची, विशेषतः विहिरीतील पाणी पंप हा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

अचानकपणे वाढलेल्या वीज प्रवाहामुळे चव्हाण यांच्या विहिरीतील पाण्याच्या पंपाचे वायडिंग जळून गेले आहे. त्यामुळे त्यांना तो पंप रिवायडिंग करण्यासाठी इलेक्ट्रिकल दुरुस्ती करण्यासाठी द्यावा लागला आहे. तर चव्हाण यांच्या घरातील ३ पंख्यांचे वायडिंग जळले आहे. तर एका पंख्याचा रेग्युलेटर जळला आहे. टेंबवाडीतील आम्रपाली सोसायटीतील रहिवाश्यांपैकी काही जणांचे दूरदर्शन संचासह अन्य उपकरणे जळली आहेत. तसेच टेंबवाडीतील अन्य काही घरांतील पाण्याच्या पंपांसह अन्य उपकरणे जळाली आहेत. आम्रपालीतील महिलांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन शुक्रवारी संबधित अधिकार्यांना जाब विचारला. त्यावेळी या सोसायटीत कर्मचार्यांना पाठवून झालेल्या नुकसानीची माहिती नोंद वहित घेऊन त्याखाली संबंधित ग्राहकांच्या सह्या घेतल्या आहेत. मात्र याबाबतची माहिती काही ग्राहकांना न समजल्यामुळे त्यांच्या नुकसानीची नोंदच झालेली नाही. तरी संबधितांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद करुन घेतली पाहिजे. विशेषतः पाण्याचे पंप जळाल्याने भर पावसात ते बंद पडल्याने संबधितांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यातच कणकवली नगरपंचायतीचे काही भागातील पाण्याचे पंपही जळाल्याने घरगुती पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे संबधितांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

दरम्यान तीन महिन्यांपूर्वी याच पोलवरील अल्युमिनियमची तार संतोष सलून आणि राऊळ सायडिंग वर्क्स याच्या दुकानांच्या समोर अचानक तुटून पडली होती. त्यावेळी दुकानाच्या बाहेर पडत असलेले राऊळ बाल बाल बचावले होते. त्यावेळी या दोघांनी महावितरणच्या कार्यालयात पोल वरील तार्यांच्या बेफिकरी अवस्थेबाबत तातडीने बंदोबस्त करावा, असे सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!