कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त शशिकांत इंगळे यांच्या वतीने कणकवलीतील महिलांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल गुंजन भांबूरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच सुचिता मॅडम यांनी बचत गटाबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
महिलांचा सन्मान म्हणून हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तसेच महिलांनीही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्यामध्ये सक्रिय होणे काळाची गरज आहे. महिलेने मनात आणले की कोणताही इतिहास ती रचू शकते. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये संघटित होऊन काम करावे, असे शशिकांत इंगळे यांनी सांगितले. त्यावेळी सर्व महिलांनी शशिकांत इंगळे यांचे आभार मानले. यावेळी सुरेखा कट्टीमनी, पूजा इंगळे, ललिता नन्नवरे, सुमित्रा इंगळे, अंसाबाई जोशी, अनिता इंगळे, पुष्पा सुर्यवंशी तसेच इतर महिला उपस्थित होत्या.