जनता दरबार मध्ये पालकमंत्री यांनी दिला शब्द , ग्रामस्थांनी मानले आभार
माजी.खा. निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला पाठपुरावा
कुडाळ (प्रतिनिधी ) : तेर्सेबांबर्डे गावासाठी तलाठी कार्यालय मंजूर झालेले आहे. मात्र मंजूर कार्यालय होवून सुद्धा गावात कार्यालय सुरु करण्याबाबत तहसिल कार्यालयाकडून कोणतीही अद्याप कार्यवाही झालेली नाही. सध्या बिबवणे येथील तलाठी कार्यालयात तेर्सेबांबर्डे गावातील ग्रामस्थांना जमिनींचा ७/१२ उतारा, महसुलच्या इतर कामासाठी बिबवणे तलाठी कार्यालय येथे जावे लागत आहे.
त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणार असून या ठिकाणी तलाठी कार्यालय सुरु करण्याची मागणी तेर्सेबांबर्डे सरपंच रामचंद्र सुभाष परब , सदस्य अजय डीचोलकर , संतोष डीचोलकर , महेंद्र मेस्त्री , गोटू डीचोलकर , शिवराम जोशी , सागर कोरगावकर यांनी ओरोस येथील झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.