तेर्सेबांबर्डे ग्रामस्थांच्या लढ्याला यश

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

कुडाळ (प्रतिनिधी) : तेर्सेबांबर्डे रेल्वे मुख्यमार्ग ते श्री देव रामेश्वर मंदीर मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकामुळे वि‌द्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय हाेत आहे. गैरसाेय दुर करण्यासाठी भोगदा किंवा ब्रीजची आवश्यकता आहे.तसेच तेर्सेबांबर्डे गावामध्ये जाणारा मुख्य रस्ता ते रामेश्वर मंदिर हा एकमेव मुख्य रस्ता असुन गावातील विद्यार्थ्यांना कॉलेज शाळामध्ये जाण्यासाठी, ग्रामस्थांना कुडाळ येथे बाजारासाठी वाहतुक करताना त्रास हाेत आहे..गावातील आजारी व्यक्ती दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाताना रेल्वे फाटकामुळे तासंतास थांबावे लागते. त्यामुळे आजारी व्यक्तींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गावामध्ये उपकेंद्र असून रेल्वे फाटकामुळे रस्त्यापलीकडील ग्रामस्थांना गावाच्या उपकेंद्रमध्ये उपचार घेण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तसेच गावतील ग्रामपंचायतीची कामे ग्रामस्थांना करताना रेल्वे फाटकमुळे तासंतास थांबल्यामुळे वेळेत कामकाज करता येत नाही. त्यासाठी तेर्सेबांबर्डे रेल्वे मुख्यमार्ग ते श्री देव रामेश्वर मंदीर मार्गावर भोगदा किंवा रेल्वे ब्रीज मंजूर करण्याची निवदनाद्वारे मागणी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कुडाळ रुपेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली तेर्सेबांबर्डे सरपंच रामचंद्र सुभाष परब , सदस्य अजय डीचोलकर, संतोष डीचोलकर, महेंद्र मेस्त्री, गोटू डीचोलकर, शिवराम जोशी, सागर कोरगावकर यांनी ओरोस येथील झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!