खारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न

माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शिंपी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक खारेपाटण संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटण येथे नुकताच शालेय वार्षिक बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंपी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त राजेंद्र वरुणकर, दिगंबर राऊत, तसेच वेतन अधीक्षक शलाका तांबे मॅडम तसेच बँक ऑफ महाराष्ट्र खारेपाटण शाखेचे व्यवस्थापक शिवतरे साहेब व खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे, खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय सानप सर आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. व प्रशालेच्या वतीने प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक सानप सर यांनी प्रस्तावनेमध्ये प्रशालेचा परिचय करून दिला.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणानंतर मान्यवरांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेत्तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी मनोगते व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अमृत मॅडम व महेंद्र मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटे सर यांनी केले व आभार व अमृत मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!