तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन
युवासेनेचा उपअभियंत्यांना इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील प्रजिमा २२ कनेडी सुभाषनगर ते कुंभवडे मुख्यरस्ता डांबरीकरण करणे हे काम करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत पूर्ण रस्ता उखडून गेला आहे. पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खराब झालेला आहे. रस्त्यावरील डांबरी थर, गेला असून खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरुन रोज शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, गावातील ग्रामस्थ यांची ये-जा असते त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक करताना अपघात होवू शकतो, त्यामुळे १५ दिवसाच्या आत रस्त्यावर आलेली खडी, डांबर थर योग्य ती उपाययोजना करुन रस्ता व्यवस्थित करावा. नाहीतर १६ व्या दिवशी जनआंदोलन करण्यात येईल. असा इशारा युवा सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता के. के. प्रभू यांना दिला आहे. यावेळी युवसेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुका समन्वयक गुरुनाथ पेडणेकर, युवसेना तालुका समन्वयक तेजस राणे, माजी सरपंच आप्पा तावडे, ग्रा. स. संदीप सावंत, उपशाखाप्रमुक मातोस डिसोझा, युवासेना शाखाप्रमुख चेतन गुरव, चेतन तावडे, प्रतिक रासम आदी उपस्थित होते.