डॉ. स्वप्नील भोगटे कुटुंबियांन कडून शैक्षणिक साहित्य यांचे वितरण
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा !
आचरा (प्रतिनिधी) : देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद शाळा पळसंब नं 1 मध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक विनोद कदम यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला श्री कदम यांनी उपस्थितांना स्वातंत्र दिन आणि त्याचे महत्व पटवून दिले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पळसंब येथील डॉ.स्वप्नील भोगटे व डाॅ. स्वरा भोगटे कुटुंबियांन कडून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.(वह्या) यावेळी बोलताना डॉ स्वप्नील भोगटे म्हणाले की माझ्या शाळेसाठी, मुलांसाठी काहीही गरज पडली तर फक्त हाक मारा कुठे काहीही कमी पडू देणार नाही.
तर शिक्षण हि तुमचे भविष्यातील करीयर घडवण्याची संधी आहे. शिक्षणाने अनेक नोकरी उद्योगाची दारे आपोआप उघडतील असे मनोगत डॉ. स्वरा भोगटे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळेची मुले भविष्यात अधिकारी होवोत हि पळसंब गावाची इच्छा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक आणि पालक यांनी प्रयत्न करावेत त्यासाठी जे सहकार्य लागेल ते आपण देण्यासाठी तयार आहोत असे आश्वासन उपसंरपंच अविराज परब यांनी दिले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत सावंत, पळसंब उपसरपंच अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय परब, सौ. रुपाली सावंत, सुहास सावंत, प्रमोद सावंत, अमरेश पुजारे, रमेश मुणगेकर, मोहन आपकर, अरुण माने, राजन पुजारे, शिक्षक वर्ग ,अंगणवाडी सेविका असे गावातील सर्व मान्यवर महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात निपून भारत अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती श्रीमती योगीता कदम यांनी दिली. शाळेचे नुतन शिक्षक दर्शन हजारे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शन हजारे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती सोनगडे मॅडम यांनी केले.