तब्बल ४००० नारळ आणि ५५ हजार रोख बक्षीसांची भव्य नारळ लढविणे स्पर्धा
उद्योजक पिंट्या नार्वेकर पुरस्कृत आणि बाळराजे मित्र मंडळ यांचे आयोजन
चौके (अमोल गोसावी) : बाळराजे मित्र मंडळ आयोजित आणि पिंट्या नार्वेकर पुरस्कृत, निलेश राणे चषक ही एकूण 55 हजार बक्षिसांची आणि तब्बल 4000 नारळांची, भव्य ‘नारळ लढवणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सातेरी मंदिर काळसे , होबळीचा माळ येथे या स्पर्धा संपन्न होणार आहेत. बाळराजे मित्र मंडळ आयोजित आणि पिंट्या नार्वेकर पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी या स्पर्धा आयोजित केला असून दुपारी दोन वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 55 हजार बक्षिसांची आणि तब्बल 4000 नारळाचे हे भव्य स्पर्धा असणार आहे.
३० नारळ, २० नारळ , १० नारळ अशी वेगवेगळी स्पर्धा होणार आहे. ३० नारळच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक १५,००० रुपये द्वितीय क्रमांक १०,००० रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार असून या स्पर्धेची प्रवेश फी १८०० रुपये आहे. तर वीस नारळाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ११,००० व द्वितीय क्रमांक ७००० आणि आकर्षक देण्यात येणार असून या स्पर्धेची प्रवेश फी १२०० आहे. दहा नारळाच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ८,००० व द्वितीय क्रमांक ४,००० आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे , तर या स्पर्धेचे प्रवेश फी ही ८०० आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकास मंडळाकडून एक टी-शर्ट देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या काही काही नियमांचे स्पर्धकांनी पालन करणे गरजेचे आहे. स्पर्धकांना नारळ मंडळाकडून दिले जाणार आहेत. तसेच स्पर्धा ही खुल्या स्वरूपाचे असणार आहे. स्पर्धकांनी प्रवेश फी 16 ऑगस्ट पर्यंत भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. या स्पर्धेदरम्यान स्पर्धकास दुखावत झाल्यास मंडळ जबाबदार नसणार आहे. या स्पर्धेचे काही उर्वरित नियम हे स्पर्धा ठिकाणी सांगण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये फेरफार करण्याचा अधिकार हा मंडळाकडे राखून ठेवण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त संघाने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, आणि अधिक माहितीसाठी विवेक नाईक – ८८०६३८२४६५, आबा काळसेकर- ८२७५३१६०८३, अमित खोत- ९४०५५४०९५७, प्रज्वल प्रभू – ९४२०७५४८०८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बाळराजे मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धा youtube लाईव्ह च्या माध्यमातूनही पाहता येणार आहेत.