श्री शिवशंभो सामा. कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कणकवली तर्फे फोंडाघाट मध्ये जल्लोषात आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, फोंडाघाट येथे “हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रे” चे आयोजन करण्यात आले होते. भगवान प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, ज्ञानोबा, तुकोबाराय आणि सर्व क्रांतिकारक यांचा परमपवित्र भगवा ध्वज या पदयात्रेचे नेतृत्व करत होता. भारतात भगव्या ध्वजाचे महत्व अधोरेखित करून हिंदू धर्माच्या जनजागरणासाठी ही पदयात्रा संपन्न होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सकाळी ठिक ०९.३० वाजता हनुमान मंदीर, फोंडाघाट येथून गावच्या सरपंचांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे औक्षण करुन, या पदयात्रेस सुरवात करण्यात आली. यावेळी सरपंच संजना आग्रे, प्रज्ञा सामंत, मनिषा चव्हाण, राजेश्वरी जोइल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.हनुमान मंदीर शिवस्मारक कुळाची वाडी या मार्गाने राष्ट्रभक्तीपर गीते गात ही पदयात्रा काढण्यात आली. नक्शे पर से नाम मीटा दो पापी पाकिस्तान का, ही अनादी भरतभू, मर्दाची तुटली बघा रं ढाल, बने हम हिंद के योगी अशा राष्ट्रभक्तीपर गीतांनी संपूर्ण फोंडाघाट परिसर दुमदुमून गेला.
समारोपावेळी हिंदुस्थानावर घोंगावणारी संकटे, त्यांचे भविष्यात होणारे परिणाम आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी आपली– हिंदु एकजूट, मजबूत संघटन बनवण्यासाठी आवाहन करण्यात आले. शिवस्मारका ठिकाणी ध्वजाचे औक्षण करण्यात आले. पदयात्रेत अशोक लाड, प्रशांत गुरव, अभिजीत मिस्त्री, सिद्धांत चावरी , प्रदीप कातरूड,अखिलेश राणे, सनी चव्हाण, अक्षय लाड,अर्जुन कोकरे, प्रकाश कोकरे, शरद कोकरे, दर्शन बर्गे,प्रथमेश हुंबे, संदीप शिंदे, विजय कातरुड ,संजय शिंदे, तन्मय सापळे,ओंकार लाड, एकनाथ मिस्त्री, विलास पांचाळ, गुरुनाथ मिस्त्री, प्रतीक पाटील, गणेश मिस्त्री, सोन्या धुरी, निखिल तेली, प्रतिक रेडकर, अक्षय धुरी इत्यादी मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. तसेच या पदयात्रेत स्थानिक ग्रामस्थांचा विशेष सहभाग होता. श्री शिवशंभो सामाजिक कला-क्रिडा मंडळ, फोंडाघाट यांनी समारोपावेळी चहापानाची व्यवस्था केली.तसेच पोलीस बांधवांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचेही मनःपूर्वक आभार मानण्यात आले.यापुढेही देव-देश-धर्म कार्यात सर्वांनी अजून ताकदीने सामील व्हावे, ही विनंती करण्यात आली.