५वर्षे मिळवलेल्या देशस्तरीय नावलौकिकाबद्दल मान्यवरांकडून गौरवोद्गार
कणकवली (प्रतिनिधी) : एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथकाला ५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या वर्धापनदिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे डॉ. विद्याधर तायशेटे, कणकवली कॉलेज कणकवली प्राचार्य डॉ.युवराज महालिंगे, गोपूरी आश्रमचे अध्यक्ष प्रा.डॉ.मुंबरकर, अभिनेते निलेश पवार, प्रा.डॉ.सोमनाथ कदम, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त श्री देव शिवारा येथे वाद्यपूजन करण्यात आले. दिल्ली येथे पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत वादन, ओडिशा पुरी जगन्नाथ मंदिर वादन, देश विदेशातील प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत २६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या दिल्ली प्रजासत्ताक दिन सोहळा वादनात सहभाग, १७५ वादनांचा महत्वपूर्ण टप्पा हे सर्व या वर्षात घडले व सिंधुगर्जना पथक नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात देखील अग्रेसर असते याबद्दल मान्यवरांनी ढोलताशा पथकाचे विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कणकवली महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कणकवली अर्बन निधी बँक चे संचालक प्रितम पारकर व प्राची पारकर, कणकवली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वादकांचे पालक, सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या अध्यक्षा सुरेखा भिसे, संस्थापक प्रा. हरीभाऊ भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, ऋषिकेश भिसे, अनुजा भिसे खजिनदार शुभम पवार, पथक प्रमुख नितीन चव्हाण,उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे,महिला प्रमुख रिदा मन्सूरी,महिला उपप्रमुख मिनल साबळे व सर्व पदाधिकारी आणि सिंधुगर्जना पथकाचे सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम HPCL हॉल कणकवली कॉलेज या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार, प्रास्ताविक सर्वेश भिसे यांनी केले सर्व उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर आभार प्रा. हरीभाऊ भिसे यांनी मांडले. ५व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सिंधुगर्जना ढोल ताशा पथकाचे १७५ वे वादन अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे करण्यात आले. यावेळी सिंधुगर्जनाच्या ढोलताशांच्या गजरात आसमंत निनादला व गर्दी जमली होती.