स्वातंत्र्य दिनी त्रिरत्नाचा सत्कार

दिगंबर जाधव, कविंद्र माळगावकर आणि गुरुनाथ बिर्जे यांचा सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिंदर गावातील लोकांनसाठी प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या त्रिरत्नाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सलग तीन वर्षे मालवण तालुक्यात ग्राम रोजगार सेवक अव्वल ठरून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिगंबर महादेव जाधव यांचा सरपंच नम्रता महंकाळ-पालकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. चिंदर गावात पोस्टमन म्हणून अनेक वर्षे वाडी वाडी वर पायपीट करून सेवा करणारे गुरुनाथ रंगराव बिर्जे यांचा उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली. चिंदरचे सचिव कविंद्र रमेश माळगावकर यांनी सोसायटीची वीस वर्षाहून अधिक सेवा करून सोसायटीला नाव लौकिक मिळवून दिल्या बद्दल भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान पत्र, गुलाब पुष्प देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सरपंच नम्रता महंकाळ पालकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, माजी सरपंच तथा भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, शशिकांत नाटेकर, जान्हवी घाडी, रिया घागरे, सानिका चिंदरकर, तंटामुक्त अध्यक्ष संतोष गांवकर, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, व्हॉइस चेअरमन सुनिल पवार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पालक, विद्यार्थी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!