कणकवली (प्रतिनिधी) : दिविजा वृद्धाश्रमात आज 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहाने आणि उस्फुर्तपणे साजरा केला.सर्व आजी आजोबांनी पांढरे शुभ्र कपडे घालून सकाळी प्रभात फेरी काढली.स्वातंत्र्याचा जयघोष करत जयघोष स्वातंत्र्यदिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा,सदैव फडकत राहो तिरंगा आपला सर्व जगात प्रिय देश आपला,जय जवान जय किसान असे नारे देवून प्रभात फेरी काढली.स्वातंत्र्य दिनाचा आनंद आजी आजोबांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
या कर्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अजित कावल उपस्थित होते.यावेळी आश्रमातील ध्वजारोहण अजित कावल यांच्या हस्ते करण्यात आले. अजित कावल हे गोरगरीब मुलांना,विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम मोफत करत आहेत.त्यांचे सामाजिक कार्य हे एक सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकावून आजी आजोबांनी ध्वजवंदना करत राष्ट्रगीत गायिले. सर्व आजी-आजोबा व आश्रमातील सर्व कर्मचारी वर्गानी ध्वजगीत गायिले.त्यानंतर पहिल्यांदाच आश्रमात आजी –आजोबांनी नाच व गाण्याचा कार्यक्रम केला. हम होंगे कामयाब या गाण्यावर नाचाचा ठेका सर्व आजी आजोबांनी धरला तर आश्रमातील महिला कार्मचार्यानी संदेशे आते हे या गाण्यावर सुंदर प्रकारचे नृत्य करून आजी -आजोबांचे मनोरंजन केले.आश्रमातील आजोबा पांडुरंग सावंत यांनी ए मेरे वतन के लोगो हे गाणे आपल्या सुस्वर आवाजात साजरी केली.
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये यांनी केले होते.या कर्यक्रमाला संस्थेचे खजिनदार अविनाश फाटक,सौ मैथिली फाटक,दिविजा वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.कर्मचारी समीर मिठबावकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्याचे व कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व उपस्थीतांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.