गणेश बांदेकर, अथर्व पालव, अण्णा सावंत उपविजेते
काळसेत बाळराजे मित्रमंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चौके (अमोल गोसावी) : शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी काळसे सातेरी मंदिर नजीक भव्य दिव्य अशी बाळराजे मित्र मंडळ आयोजित आणि पिंट्या नार्वेकर पुरस्कृत, निलेश राणे चषक नारळ लढवणे स्पर्धा मातब्बर खेळाडूंच्या सहभागात आणि शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थित संपन्न झाली. तीन गटामध्ये घेण्यात आलेल्या या अटीतटीच्या स्पर्धेचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. या स्पर्धेत ३० नारळ गटामध्ये स्वामी कृपा मालवण संघाचा राजा सावंत हा अंतिम विजेता ठरला तर गणेश बांदेकर हा उपविजेता राहिला. दुसऱ्या गटामध्ये म्हणजे २० गटामध्ये कु. हर्ष हळदणकर हा विजयी झाला तर अथर्व पालव याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आणि तिसऱ्या म्हणजे १० नारळ गटामध्ये पिंट्या नार्वेकर अंतिम विजयी झाले आणि अण्णा सावंत हे उपविजेते राहिले. या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्व विजेत्या उपविजेत्या स्पर्धकांना आकर्षक निलेश राणे चषक आणि रोख पारितोषिके बाळराजे मित्रमंडळाचे पिंट्या नार्वेकर ,भाऊ नार्वेकर , नाना खोत , माजी सरपंच केशव सावंत, चिंतामणी प्रभु, गौरी नार्वेकर, सावली नार्वेकर, अभिनव नार्वेकर, बाळू खोत आदी मान्यवरांच्या हस्ते देउन गौरवण्यात आले. तसेच या स्पर्धेदरम्यान उपस्थित प्रेक्षकांसाठीही आयोजकांच्या वतीने लकीड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लकी विजेते ठरलेले मनोज परब, निकिता प्रभु, यश म्हापणकर, अक्षय घाडी आणि अक्षय काळसेकर यांना बक्षीस म्हणून स्मार्ट वॉच आणि ईअर बड्स मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
तत्पूर्वी दुपारी जिल्हा बॅंक संचालक बाबा परब यांच्या हस्ते या माजी खासदार निलेश राणे चषक नारळ लढवणे स्पर्धेचा शुभारंभ करण्यात. आला यावेळी व्यासपीठावर जिल्हा बॅंक संचालक प्रकाश मोरये, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माडये, धामापूर सरपंच मानसी परब, माजी सरपंच केशव सावंत, कृषी विस्तार अधिकारी सुनिल चव्हाण, उद्योजक बंडु माड्ये, मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, सामाजिक कार्यकर्ते चिंतामणी प्रभु, धोंडी म्हापणक, सचिन राणे, पंचायत समिती विषयतज्ज्ञ गौरी नार्वेकर , सायली नार्वेकर, ॲड. प्रदिप मिठबावकर, प्रवीण मिठबावकर, माजी सभापती राजेंद्र परब, सतिश वाईरकर, सुमित सावंत, दिपा सावंत, आतिक शेख, अमित खोत, प्रज्ज्वल प्रभु, संदु प्रभु, अक्षय काळसेकर, आबा काळसेकर, सचिन सावंत, बाबल्या म्हापणकर, विवेक नाईक, मिडनाईट रायडर्स ग्रूपचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध मालवणी समालोचक बादल चौधरी यांनी केले. भव्यदिव्य अशी ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी बाळराजे मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व मिडनाईट रायडर्स ग्रूपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.