खारेपाटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खारेपाटण शाखेच्या वतीने

भव्य १ लाख ११,१११ रुपये रकमेच्या दहीहंडीचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा खारेपाटण यांच्या वतीने व खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा खारेपाटण विभाग शिवसेना संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या सौजन्याने प्रथमच श्रीकृष्ण जन्माष्टी व दहीकाला उस्त्वनिमित्त मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी भव्य व मोठ्या बक्षीस रकमेच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नवनिर्वाचित खारेपाटण शिवसेना विभाग प्रमुख निखिल गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

खारेपाटण गावात सार्वजनिक दहीकाला उस्तव हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.खारेपाटण एस टी बस स्थानक येथे दशक्रोशितील नागरिकांची दहीकाला उस्तव व दहीहंडीचे रोमांचक थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. परंतु यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य १,११,१११ रुपये मोठ्या बक्षीस रकमेच्या अर्थात स्पर्धेच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आल्याने मुंबई,ठाणे,रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील गोविंदा पथके खारेपाटण येथे दाखल होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये उस्तुकाता वाढली आहे.

यामध्ये पाच थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकास ३०००/- रुपये तर सहा थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकास ४०००/- रुपये आणि सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकास ५०००/- रुपये बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच जो गोविंदा पथक दहीहंडी फोडेल त्याला १,११,१११/- रुपये सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच या दहीहंडी उस्तवा निमित्त प्रेशकासाठी खास आकर्षण म्हणून कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा स्वरमिलनच्या बहारदार संगीत नृत्य कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या या दहीहंडी उस्तवात जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन खारेपाटण विभाग शिवसेना संपर्क प्रमुख तथा आयोजक सतीश गुरव यांनी केले आहे.तर ज्या गोविंदा पथकांना या स्पर्धेच्या दहीहंडी उस्तवात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे शिवसेना पदाधिकारी श्री निखिल गुरव – ९८३३३७७०१५,महेश कोळसुलकर – ८३२९०८४०३०,किरण गुरव – ९५७९५६४६४८,तेजस राऊत – ८२३७३६४४६० यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!