‘ शिवशक्ती महिला गोविंदा पथक’ – राजापुरच्या मुली यंदा मुंबईमध्ये दहीहंडीचे थर लावणार

गावच्या मुली कोकणाचे नाव मुंबईसह महाराष्ट्रात गाजणार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणातील प्रसिद्ध असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांचा शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर या वर्षी प्रथमच दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मायानगरीत अर्थात मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यासारख्या मोठ मोठ्या दहीहंडीच्या स्पर्धेत सहभागी होणार असून शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापुरच्या या गोविंदा पथकातील कोकण कन्या थरारक मनोरे रचून मुंबईतील दहीहंडी स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर चे कार्यवाह व प्रशिक्षक प्रतीक अशोक गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

कोकणातील एकमेव महिला गोविंदा पथक म्हणून ओळख असणाऱ्या राजापूरच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाचे हे १९ वे वर्ष असून दरवर्षी या गोविंदा पथकाच्या मुली मुंबई मध्ये सराव करून गावी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहीहंडी फोडण्यासाठी जात असत परंतु यंदा २४ ऑगस्ट ला मिरा रोड एक्सपर्ट गोविंदा आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसीएशन आयोजित राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धेत राजापूरचे शिवशक्ती महिला गोविंदा पथक कोकणचे नाव उज्ज्वल करण्यासाठी स्पर्धेत उतरणार आहे.

नुकत्याच या पथकातील महिला गोविंदांनी कसून सराव करायला सुरवात केली असून आकर्षक मनोरे रचत ६ थराची सलामी देत आहेत.तर ७ थर लावण्याची जिद्द या महिलांनी बाळगली असून त्याचा सराव सुरू असल्याची माहिती शिवाशकी महिला गोविंदा पथकाच्या व्यवस्थापक प्रतीक गुरव यांनी दिली आहे. २७ ऑगस्ट २०२४ रोजी दहीहंडीच्या दिवशी मुंबई-ठाणे मधल्या मोठ्या मोठ्या दही हंड्यांमध्ये आमचे महिला गोविंदा पथक सहभागी होणार असून कोकणातील हे एकमेव महिला गोविंदा पथक ६ थर लावून ७ थरांचा विश्वाविक्रम करण्याचा तयारीत आहे. तरी या पथकाच्या धाडसी उपक्रमाला रत्नागिरी चे नेते किरण उर्फ भैया सामंत यांनी सर्वोतपरी पाठबळ दिले असून पथकाची तयारी आणि त्यांच्या या सर्व प्रवासात भैया सामंतजी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

मुंबईतील दहीहंडी उत्सवात कोकणचे नाव आम्ही नक्कीच उंचावू असे या गोविंदा पथकातील महिलांनी सांगितले असून सर्व मुंबईतील चाकरमानी मंडळींनी आपल्या या कोकणातील महिला गोविंदा पथकामधे सहभागी होऊन आपल्या भगिनींना साथ द्या असे आव्हान शिवशक्ती महिला महिला पथकाचे कार्यवाह प्रशिक्षक प्रतिक अशोक गुरव (८८५००१६३५२)यांनी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!