महामार्गांवर साईट पट्टीवर झाडी झुडपे व मोठे गवत वाढल्यामुळे अपघात होण्याची शक्यता

वैभववाडी (प्रतिनिधी) : तरेळे गगनबावडा राष्ट्रीय महामार्गांवर मार्गावर कोकिसरे ते एडगाव दरम्यान महामार्गांवर साईट पट्टीवर झाडी झुडपे व मोठे गवत वाढल्यामुळे थेट रस्त्यावरील पांढऱ्या पाट्याच्या आत आल्यामुळे पादचाऱ्यांना जीवमुठीत धरून ये जा करावी लागत आहे. शाळकरी मुले रस्त्याने ये जा करत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अपघात घडून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. गणेश उत्सवपूर्वी रस्त्याच्या दुतरफा साईड पट्टी मोकळी करावी. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.    

तरेळे गगनबाववा महामार्ग कोकिसरे, वैभववाडी शहर, एडगाव या गावातून जातो. या दरम्यान रस्त्याच्या दुतरफा झाडी वाढली आहे. तसेच गवत वाढल्यामुळे थेट रस्त्यावर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यावर आली आहे. या महामार्गवरून सतत वाहनाची सतत वर्दळ असते. कोकिसरे व एडगाव येथील ग्रामस्थ, शाळकरी मुले वैभववाडी बाजारपेठत चालत ये जा करीत असतात. मात्र साईड पट्टीवर वाढलेली झुडपे व गवतामुळे पादचाऱ्यांना साईडपट्टीवर चालता येत नाही. तर रस्त्यावरून चालताना वाहनाचा धक्का बसून अपघात घडण्याची शक्यता आहे. मात्र याकडे नागरिकांकडून लक्ष वेधूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करीत आहे.    

कोकणातील प्रमुख सण असलेला गणपती उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी तातडीने साईडपट्टीची साफसफाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा मार्ग पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यावेळी मैलकुली रस्त्याच्या दूतर्फ असलेली झाडी झुडपे साफसफाई केली जात होती. मात्र रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यापासून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

error: Content is protected !!