वयोवृद्ध जेष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर दाबक्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य झाले आहे. ग्राहकांना चिखल तुडवत बँकेत जावे लागत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्राहकांडून केली जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांची वैभववाडी तालुक्यातील ही एकमेव शाखा आहे. राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे या बँकेत तालुक्यातील ग्राहकांची मोठी संख्या आहे. मात्र बँकेच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत अनेक लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. तर यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्रज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना हा चिखल तुडवत बँकेत प्रवेश करावा लागत आहे. तर वयोवृद्ध जेष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय होतं आहे. तरी बँक प्रशासने तातडीने उपाययोजना करावी. अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.