देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय अरुण मेस्त्री “समाज भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित

आचरा (प्रतिनिधी) : विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौडेशन पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा “समाज भूषण पुरस्कार” देवगड तालुक्यातील गवाणे येथील उद्ययमुख युवा चित्रकार अक्षय अश्विनी अरुण मेस्त्री याला पुणे येथे देऊन सन्मानित करण्यात आले.

विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौंडेशन ट्रस्ट हे गेल्या दहा वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. फौंडेशनचा दशकपूर्ती वर्धापन दिनानिमित्त यावर्षी दहा सन्मानिय व्यक्तींची निवड करुन समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

अक्षय मेस्त्री यांच्या अंगी असलेली चित्रकला जोपासत या चित्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत सामाजिक बांधिलकी जपत आल्याने तसेच जखमी प्राणी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडणे तसेच निसर्ग संवर्धनासाठी करीत असलेल्या जनजागृती कार्याचा गौरव म्हणून विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौंडेशन ट्रस्ट यांच्यावतीने प्रतिवर्ष दिल्या जाणाऱ्या “समाज भूषण” पुरस्काराकरिता अक्षय मेस्त्री याची निवड करण्यात आली होती.

विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौंडेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच त्या त्या क्षेत्रात विशेष, उल्लेखनीय, समाजास भूषणावह परंतु प्रसिद्धी परामुख कार्य करणाऱ्या अश्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात येतो.

नुकतेच या “समाज भूषण पुरस्कार” समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. अक्षय मेस्त्री यांना समाज भूषण पुरस्कार विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौडेशन पुणे या संस्थेचे अध्यक्ष विवेकानंद सुतार तसेच बी.एम.सी.सी कॉलेज पुणेचे
प्रा.डॉ.प्रशांत साठे या प्रमुख अतिथीच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याबद्दल अक्षय मेस्त्री याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!