खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व कट्टर नारायण राणे समर्थक तथा कुरांगवणे – बेर्ले गावच्या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच निवृत्ती उर्फ बबलू पवार यांची नुकतीच भाजप पक्षाच्या तळेरे पंचायत समिती विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते नुकताच नवनिर्वाचित तळरे पं.स.विभागीय अध्यक्ष बबलू पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कुरंगवणे – बेर्ले गावचे सरपंच व भाजप कार्यकर्ते पप्पू ब्रम्हदंडे यांनी देखील कुरंगवणे गावच्या वतीने बबलू पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात केला.तर अनेक भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे तसेच दूरध्वनीद्वारे व प्रत्यक्ष भेट देऊन नवनिर्वाचित तळेरे पं.स.विभागीय अध्यक्ष बबलू पवार यांचे अभिनंदन केले आहे.