विश्व हिंदु परिषद आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराला वेंगुर्लेत उस्फूर्त प्रतिसाद

१५० नेत्र रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

शिबिरातील नेत्र रुग्णांची होणार मुंबईत मोफत शस्त्रक्रिया

आचरा (प्रतिनिधी) : विश्व हिंदु परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वेंगुर्लेत भटवाडी येथील शिरसाठ यांच्या निवासस्थानी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई स्थीत डाॅक्टर निरव दिलीप रायचुरा व डाॅक्टर दृष्टी निरव रायचुरा यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली, तसेच या तपासणीत ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे अशा रुग्णांवर मुंबईत मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचे या शिबीराचे आयोजक डाॅक्टर राजन शिरसाठ यांनी सांगितले.

शिबिराचे उद्घाटन नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, वि.हि.प.चे जिल्हा सेवा प्रमुख नंदकुमार आरोलकर, सुनिल नांदोसकर, वि.हि.प.चे नितीन पटेल, डाॅक्टर माधुरी शिरसाठ, भाजप वैद्यकीय आघाडीचे डाॅ.दर्शेश पेठे, किरात चे मराठे, शुभांगी ऑप्टीक्स चे निलेश हरमलकर व सचिन हरमलकर, रविंद्र शिरसाठ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पारकर यांनी केले व आभार प्रदर्शन डाॅ.राजन शिरसाठ यांनी केल. यावेळी नगरसेवक प्रशांत आपटे, वि.ह.प.चे गिरीश फाटक, शिरसाठ मिठाई चे बाळा शिरसाठ, गो – सेवा आयोगाचे दिपक भगत, किर्तीमंगल भगत, रा.स्व.संघाचे नित्यानंद आठलेकर, विशाल सावळ, उद्योजक दिपक माडकर, शिवदत्त सावंत इत्यादी मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!