उंडील तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी भालचंद्र मांजरेकर यांची निवड

उपसरपंच जयेश अशोक नर होते सूचक

तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील उंडील गावच्या तंटा मुक्त समिती अध्यक्षपदी भालचंद्र भिवा मांजरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच जयेश अशोक नर हे भालचंद्र मांजरेकर यांच्या निवडीला सूचक होते. उंडील  गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसंदर्भात 15 ऑगस्ट रोजी तहकूब झालेली सभा आज 29 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या सभेत भालचंद्र मांजरेकर यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी एकमुखी निवड करण्यात आली. भालचंद्र मांजरेकर यांच्या निवडीसाठी कृष्णा नर यांनी अनुमोदन दिले. यावेळी सरपंच उज्वला यादव, उपसरपंच जयेश अशोक नर, ग्रामसेवक श्री.कांबळी, माजी सरपंच विश्वास तानावडे, माजी उपसरपंच मनोहर नर, अंगणवाडी सेविका पार्वती नर, ज्योती तावडे, मोतीराम शेलार, किशोर नर, विश्वास नर,मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस कर्मचारी तुकाराम तावडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!