कै.मनोरमा महादेव चौधरी चॅरीटेबल ट्रस्ट ने दिला मदतीचा हात
कुडाळ (प्रतिनिधी) : मागासवर्गीय एज्यू सोसायटी मांडकुली- केरवडे संचलित प.पू आप्पासाहेब पटवर्धन माध्य विद्यालयात कै.मनोरमा महादेव चौधरी चॅरीटेबल ट्रस्ट वालावल ता. कुडाळ संस्थेकडून प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी,कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे,ट्रस्टचे सचिव संदिप साळसकर,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे,संस्था सचिव अंकुश जाधव,खजिनदार अर्जून परब, उपखजिनदार करीष्मा भोई, संचालक सतीश पडते,वामन गावडे शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष बाबाजी पेडणेकर,देवदत चुबे,शिक्षक,पालक इ.उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे यांचा परिचय मुख्याध्यापक श्री.खोत यांनी करून दिला.संस्था व प्रशालेच्या वतीने उपस्थीत मान्यवरांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कै.मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गणवेश,फॅन,वहया,ट्यूबलाईट इ. शैक्षणिक साहित्यचे वितरण करण्यात आले.तसेच त्यांचे मित्र सुर्यकांत बागवे यांनी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्वरूपात मदत केली.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना रुपेश कानडे यांनी प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत कौतुक करून प्रशालेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.श्री साळसकर यांनी ट्रस्टच्या कामाबाबत माहती देवून विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेवून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे विचार मांडले.दयानंद चौधरी यांनी ग्रामीण भागात शाळा असून चांगले काम चालू असून आपण आपल्या ट्रस्टकडून प्रशालेला एक स्मार्ट टीव्ही देण्याचे व विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासीत केले. तहसीलदार वसावे यांनी स्पर्धा परीक्षा व करीअर संधी याबाबत मार्गदर्शन करून पुन्हा प्रशालेस भेट देवून पालक व विद्यार्थी यांची आपण कार्यशाळा घेऊ असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरवटे सर यांनी केले.आभार सौ. रांगणेकर मॅडम यांनी मानले तर कार्यक्रम आयोजनासाठी राहूल कानडे सहा शिक्षक यांनी विशेष प्रयत्न केले.