शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मंगेश लोकेंची पोलीस निरीक्षकांकडे मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : मालवण राजकोट किल्यावर पुतळा पाहणी दौऱ्यावेळी शिवसैनिकांना धमकी देणाऱ्या खासदार नारायण राणे यांच्यावर गुन्हा दखल करावा. अशी मागणी उबाठाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक वैभववाडी यांच्याकडे केली आहे.
पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट रोजी कोसळला.हे राज्य व केंद्र शासनाचे अपयश आहे. याविषयी शासनाच्या चुकीच्या कामाबद्दल काही न बोलता फक्त शिवसेना नेते आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पाणी करायला आले होते. त्यांचा दौरा हा नियोजितच होता परंतु त्यांच्या दौऱ्यामध्ये काहीतरी अडथळा आणून वाद निर्माण करणारा प्रयत्न माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि या मतदार संघाचे विद्यमान खासदार यांनी व त्यांच्या भाजपच्या सहकार्याने केला. त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष अत्यंत खालच्या भाषेत अरेरावीची भाषा वापरून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना पोलिसांच्या समोर दमदाटी केली. त्याचप्रमाणे मी कोण आहे हे माहित आहे का? एकेकाला घरात घुसून मारून टाकीन अशी भाषा संपूर्ण पोलीस यंत्रणा व मीडियासमोर वापरली या सर्व प्रकारची आपल्याकडून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या व वर्तमान बातम्यांची पडताळणी करून अशी धमकी देणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांनी दिलेल्या धमकीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाले आहे. तरी त्यांच्या अशा वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी या निवेदनातून केली आहे.