या रस्त्यासाठी झाले होते आंदोलन
आम.नितेश राणेंच्या लेखी आश्वासनानंतर कामाला सुरुवात
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बावशी फाटा ते बावशी गावात जाणारा मुख्य रस्त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. बावशी तिरंगा ग्राम संघातर्फे बावशी गावच्या चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांच्या पुढाकाराने आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी आमदार नितेश राणेंच्या वतीने लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.याची पुर्तता होत असून नुकतेच उद्घाटन झाले असून कामाला सुरुवात झाली असून समाधान व्यक्त केले जात आहे. या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी पंचायत समिती सदस्या सौ.हर्षदा वाळके,
सरपंच सौ.मनाली गुरव, उपसरपंच अशोक बोभाटे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर , खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर ,ग्रामसेवक चव्हाण, बावशी भाजपचे बुथ अध्यक्ष जयेश राणे, तोंडवली भाजपचे बुथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर ,भाजपा बावशी गाव अध्यक्ष दीनानाथ कांडर ,माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक कांडर, सुभाष नार्वेकर ,विलास कांडर ,श्री केसरकर, माजी सरपंच उमेश कुडतरकर , पोलिस पाटील समीर मयेकर, एकनाथ कांडर, अविनाश बावकर ,हर्षद कांडर ,भरत कांडर , दीपक मर्ये , सचिन सावंत ,महादेव कांडर, ग्रामपंचायत सदस्या सानिका गावडे ,सदा कुडतरकर ,सौरभ कांडर आदी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
[…] अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवा… […]