खारेपाटण हायस्कूल एन. सी. सी. विभागाच्या वतीने

‘एक पेड मा के नाम ‘ अभियान संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मध्ये ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ‘ एक पेड मा के नाम ‘ हे महत्वपूर्ण अभियान शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच राबविण्यात आले. यावेळी खारेपाटण हायस्कूल मधील सर्व एन सी सी कॅडेट विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या रोपांचे वाटप प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांनी ही रोपे आपल्या घराच्या परिसरात आपल्या आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लावावी.व त्याची जपणूक करून वाढवावी.असे आवाहन एन सी सी अधिकारी राम कापसे यांनी सर्व एन सी सी कॅडेट विद्यार्थ्यांना केले. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी या रोपांची निगा राखून आम्ही त्यांना काळजीपुर्वक वाढवू. अशी प्रतिज्ञा यावेळी सर्व एन सी सी कॅसेट्स देण्यात आली. याप्रंगी शालेय हरित सेनेचे प्रमुख लक्ष्मीकांत हरयान एन सी सी ऑफिसर राम कापसे व एन सी सी कॅडेट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!