वैभववाडी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा नाम.रविंद्र चव्हाण यांच्या उद्या 20 सप्टेंबर 2024 रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा वैभववाडी तर्फे रक्तदान शिबिर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच स्वच्छता मोहीम कार्यक्रम सकाळी ठीक 9.30 वाजता दत्तमंदिर वैभववाडी येथे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शक्तीकेंद्रप्रमुख, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व सरपंच, उपसरपंच, बूथ अध्यक्ष, महिला मोर्चा पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन मंडळ अध्यक्ष भाजपा, वैभववाडी सुधीर नकाशे यांनी केले आहे.
ना रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे वैभववाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन










