जानवली युवासेना शाखाप्रमुख पदी निलेश पवार व उपशाखाप्रमुख पदी स्वप्निल पवार यांची नियुक्ती
आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज जानवली येथील भाजपा सरपंच यांच्या जवळीक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले व पक्ष बांधणीसाठी जबाबदारी देखील दिली. यात जानवली युवासेना शाखाप्रमुख पदी निलेश पवार व उपशाखाप्रमुख पदी स्वप्निल पवार यांची आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. यात अमर जाधव, आशुतोष पवार, राजेंद्र जाधव, भगवान पवार, हर्षल पवार, प्रवीण पवार, सुशील तांबे, सुभाष जाधव जगदीश पवार, सौरभ कदम, समीर कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, जेष्ठ शिवसैनिक भालचंद्र दळवी, संदेश मुरकर, युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके, युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गांवकर, युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, जाणवली विभाग प्रमुख किरण वर्दम, जाणवली शाखाप्रमुख प्रवीण कदम व आदी प्रवेश करते उपस्थित होते.