मालवण (प्रतिनिधी) : मी यापूर्वी ही तळगाव सरपंच राहिलो असून पदाच्या लालसेपोटी मी भाजप प्रवेश केला म्हणणाऱ्या सरपंच मॅडम ना माझे खुले आव्हान आहे की त्यानी पदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे. सरपंच मॅडम ज्या प्रमाणे बोल्या की काही वर्षांपूर्वी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला होता असे सरपंचांचे म्हणणे आहे, याचा अर्थ आमच्या येण्यानेच शिवसेनेची सत्ता आली होती अशी कबुलीच सरपंचांनी दिली आणि हे देखील त्रिवार सत्य आहे. आणि आता जर आम्ही आणि सहकारी इतर पक्षात गेलो त्याचा अर्थ उबाठा शिवसेना या पक्षाची विश्वासार्हता संपली. खरंतर ज्या शिवसेना नेतृत्वाकडे पहात आम्ही शिवसेना प्रवेश केला होता त्यांच्याकडे शिवसेना हाच पक्ष राहीला नसल्याने गावच्या विकास दृष्टिक्षेपात ठेवून निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजप मध्ये प्रवेश केला. आणि जर सरपंचा नाही गावचा विकास हवा असेल तर त्यांच्यासाठीही विकासाची द्वारे खुली आहेत. आणि ज्या सरपंचाना वारस तपासावेळी स्वतःच्या वाडीतील वारस कोण हे वारंवार तपासावे लागते यावरुन त्यानी आपण कसे निवडून आलो याचे आत्मपरीक्षण करावे. सरपंचांची कामे ही फक्त एलईडी बल्ब लावणे किंवा मागासवर्गीयांचा निधी खर्च करणे एवढीच नसून यापलीकडे आहेत हे अजून ज्याना कळत नाहीत ते गावचा विकास करू शकतील का…? तळगावच्या इतिहासात असा सरपंच लाभला ही लाजिरवाणी गोष्ट आहे… किमान सरपंच मॅडम यांनी उपविभाग प्रमुखांना त्यांच्या वॉर्ड मधील स्ट्रिट लाईट चा मीटर ची वेळोवेळी मागणी करूनही तुम्हाला देता आले नाही ते सरपंच मॅडम यांनी द्यावा व आपला वेळ सत्कारणी लावावा. तसेच आपण अनंधिकृत वाळू उपसा विरोधी ज्यांनी ठोस भूमिका कधीच घेतली नाही. व गावातील लोकांनी कोणती योजना विचारली आसता किंवा पाण्याची समस्या मांडली आसता मी त्या विहीरीत जीव देते किंवा राजीनामा देते असा ड्रामा गेली २ वर्ष उबाठा पक्षप्रमुख ज्याप्रमाने राजीनामा खिशात ठेवत होते अशा पद्धतीचा तळगावात सरपंचांनी पोरकट पणात करत गावच्या विकासाची 2 वर्ष वाया घालविली आहे. त्यामूळे त्यांनी हा ड्रामा बंद करावा. श्री देव रामेश्वरच्या आशिर्वादाने विकासाची धोरणे आम्ही निश्चित केली असून त्या अनुषंगाने निलेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच त्यांची अंमलबजावणी करू असे संतोष पेडणेकर यांनी म्हटले आहे.