कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित तालुकास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गटामध्ये व क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यामध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

कणकवली तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तरळे येथे संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला.तसेच १४ वर्षा खालील मुलींच्या गटात देखील खारेपाटण हायस्कूलच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला. तर १७ वर्षाखालील मुलांच्या गटाने खो-खो या क्रीडा प्रकारात उपविजेते पद पटकावले.

तसेच दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी फोंडा हायस्कूल येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या १७ वर्षा खालील गटाने उपविजेतेपद पटकावले.तसेच १९ वर्षाखालील कबड्डी गटात देखील मुलींच्या गटाने उपविजेतेपद पटकावले.याबरोबरच जिल्हास्तरीय सेपक टकरा या प्रकारात १९ वर्षाखालील मुले यांनी तृतीय क्रमांक पटकावला.वरील प्रथम क्रमांकाचे संघ हे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री.पाडवी सर व श्री. भिसे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वर्गाचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सेक्रेटरी महेश कोळसुलकर,सर्व संचालक मंडळ व प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत,तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!